उजनी धरणातून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रहित करण्यात येईल !

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचीघोषणा

जयंत पाटील

सोलापूर- उजनी धरणातून इंदापूरसाठी ५टी.एम्.सी. पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश रहित करण्यात येईल, अशी घोषणा १८ मे या दिवशी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

पुणे,पिंपरी-चिंचवडचे आलेले सांडपाणी इंदापूर तालुक्यालाउचलण्यासाठी शेटफळ गढी उपसाजलसिंचन योजनेला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी संमती दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौर्‍याच्यावेळी दिली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी याचा पुष्कळ विरोधकेला होता. या पार्श्‍वभूमीवर आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे,आमदार यशवंत माने यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना १७ मे या दिवशी उजनी जलाशयातून प्रस्तावित केलेल्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या स्थिरीकरण योजनेस स्थगिती देण्याविषयी पत्र दिले होते.

अधिकृत आदेश दिलेजात नाहीत,तोपर्यंत घोषणेवर विश्‍वासठेवणार नाही ! -आमदार सुभाष देशमुख, भाजप

सुभाष देशमुख

खडकवासला प्रकल्प रहित केल्याचे अधिकृतआदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील नागरिक या घोषणेवर कदापि विश्‍वास ठेवणार नाहीत. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांचे २१ मे यादिवशी पंढरपूर येथील नामदेव पायरीजवळ आंदोलन होणारच.