‘१७.५.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता मी एका साधिकेने दिलेला अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा पू. पात्रीकरकाका अंघोळीला गेले होते. ‘त्यांना भेटून जावे’; म्हणून मी ध्यानमंदिरात नामजप करत बसलो. पू. पात्रीकरकाका आल्यावर मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला अल्पाहार आणला आहे. तो ग्रहण करावा.’’ तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘मी पूजा केल्यानंतर अल्पाहार करतो.’’ नंतर मी थोडा वेळ सेवाकेंद्रात थांबलो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला. मी सेवाकेंद्राच्या फाटकाबाहेर जाईपर्यंत मला हा सुगंध येत होता.’
– श्री. रामदास चव्हाण, अमरावती (२७.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |