सावंतवाडी – खासगी कोविड केअर सेंटरमध्ये भरमसाठ शुल्क आकारणी करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडे खासगी कोविड केअर सेंटरमध्ये अधिकचे शुल्क आकारले गेल्यास तक्रार नोंद करता येणार आहे.
शासनाने आदेशानुसार ठरवून दिलेल्या दरानुसार शुल्क आकारणी करण्यात यावी, यासाठी उपचारांच्या अनुषंगाने दरफलक समितीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटरच्या बाहेर लावण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी कोविड केअर सेंटरवर निर्बंध आले असून ते आता भरमसाठ शुल्क आकारू शकणार नाहीत. या समितीचे समन्वयक म्हणून नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह डॉ. वर्षा शिरोडकर आणि पंचायत समितीचे लेखा अधिकारी वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.