चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळावर उतरले !

बीजिंग (चीन) – चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे. यामुळे मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन दुसरा देश ठरला आहे. ७ मासांचा अंतराळातील प्रवास आणि ३ मास मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवास केल्यानंतर शेवटच्या ९ मिनिटांच्या प्रवासानंतर जुराँग रोव्हर मंगळावर उतरले. ‘जुराँग’ हे चीनच्या अग्नी आणि युद्ध देवता यांचे नाव आहे. चिनी संशोधक या रोव्हरच्या साहाय्याने मंगळावरील भूप्रदेशाचा ९० दिवस अभ्यास करतील.