पुणे – लसींचा अनियमित, अपुरा पुरवठा आणि दुसर्या डोससाठी पात्र नागरिकांची संख्या अधिक असल्याने शहरात १३ मे पासून पहिल्या डोसचे लसीकरण बंद केले आहे. शासनाकडून येणारी लस प्राधान्याने दुसर्या डोससाठी वापरली जाईल. त्यामुळे १८ ते ४४ आणि ४५ पुढील वयोगटाचे पहिल्या डोसचे लसीकरण पुढील काही काळासाठी बंद केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
सध्या शासनाकडून कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा होत आहे. त्याचे २८ सहस्र डोस उपलब्ध आहेत. महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नाही. शहरात दुसर्या डोसच्या लसीकरणासाठी ११९ ठिकाणी लसीकरण केंद्रे निश्चित केली आहेत.