१. सौंदर्यवर्धनालयात येणार्या एका किन्नर व्यक्तीने ‘माझ्या नावावरील ‘प्लॉट’ एका नातेवाइकाने बळजोरीने स्वतःच्या नावावर करून घेतला’, असे साधिकेला सांगणे, त्यावर साधिकेने तिला ‘साधना आणि नामजप कर’, असे सांगणे
‘नागपूरला माझे सौंदर्यवर्धनालय (‘ब्युटी पार्लर’) आहे. तेथे एक किन्नर व्यक्ती नियमित येते. तिच्याशी मी प्रेमाने बोलायचे आणि तिला थोडी थोडी साधनाही सांगायचे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या घरची परिस्थिती मला सांगितली. ‘माझ्या नावावरील एक ‘प्लॉट’ एका नातेवाइकाने बळजोरीने माझी स्वाक्षरी घेऊन स्वतःच्या नावावर केला’, असे तिने मला रडत सांगितले. त्यावर मी तिला ‘साधना आणि नामजप कर’, असे सांगितले अन् सौंदर्यवर्धनालयातील श्रीकृष्णाच्या वेशातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून ‘हे तुझी अडचण सोडवतील’, असे सांगितले.
२. ‘गुरूंना स्मरून नामजप चालू केल्यावर नातेवाईकाने माझा ‘प्लॉट’ पुन्हा माझ्या नावावर करून दिला. तुमचे गुरु महान आहेत’, असे त्या व्यक्तीने सांगणे
काही दिवसांनी ती व्यक्ती माझ्याकडे पुन्हा आली आणि म्हणाली, ‘‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या गुरूंना स्मरून नामजप चालू केला आणि काही दिवसांनी त्या नातेवाईकाने माझा ‘प्लॉट’ पुन्हा माझ्या नावावर करून दिला. खरेच तुमचे गुरु महान आहेत. मला त्यांच्यासाठी चांदीचा मुकुट बनवून द्यायचा आहे. ‘कधी देऊ ?’, ते सांगा. मला त्यांना भेटता येईल का ?’’
सौ. नमिता काकडे, नागपूर (२६.९.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |