स्वयंघोषणापत्र अथवा आधुनिक वैद्यांचे कोरोना लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे
सांगली – जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात राज्यशासनाचे ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लागू असून आंतरजिल्हा हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या ‘ई-पास’ची आवश्यकता नाही. एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता आहे, त्यांना ‘ई-पास’ बंधनकारक आहे. यासाठी आवेदन करतांना कोणत्याही प्रकारच्या ‘कोरोना निगेटिव्ह’ प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ‘ई-पास’साठी आवेदन करतांना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही आधुनिक वैद्याचे ‘कोरोना १९’ची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे, अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.