गरिबांसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विकणारी दोन शिधावाटप धान्य दुकाने सील


करमाळा (जिल्हा सोलापूर) – करमाळा तालुक्यातील गरिबांसाठी असलेला शिधावाटपचे गहू आणि तांदूळ कर्जत (जिल्हा नगर) येथे काळ्या बाजारात विकला जात असतांना पकडण्यात आला आहे. यानंतर तहसीलदार समीर माने यांनी २ शिधावाटप दुकाने सील केली आहेत. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून दोन पिकअप गाड्यांसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काळ्या बाजारात नेमका किती माल करमाळा तालुक्यातून कर्जत तालुक्यात आतापर्यंत विकला गेला याची चौकशी कर्जत पोलीस करत आहेत. (एकीकडे कोरोनाच्या कठीण काळात गरिबांना ज्याद्वारे किमान धान्य दिले जाते ती यंत्रणाच, हेच धान्य काळ्या बाजारात विकत असेल तर ही गंभीर गोष्ट असून अशा सर्वांवर अत्यंत कठोर कारवाईच होणे अपेक्षित आहे ! – संपादक)