१. शासनाच्या अनुमतीशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. जिल्हाधिकार्यांच्या अनुमतीने ५० किंवा त्याहून अल्पक्षमतेने लग्नसमारंभ आणि २० किंवा त्याहून अल्प क्षमतेने अंत्यविधी करता येईल.
२. शासकीय अनुमतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असेल.
३. केवळ कामावर जाणार्यांना किंवा वैद्यकीय आपत्कालीन स्थितीसंबंधी कर्मचार्यांना ने-आण करण्यासाठी निम्म्या क्षमतेने बससेवा चालू ठेवता येईल.
४. उपाहारगृहे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत निम्म्या क्षमतेने कार्यरत रहातील; मात्र उपहारगृहांमधून घरपोच सेवा देण्यास वेळेचे बंधन नसेल.
५. सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदी निर्बंध पाळून मासळी बाजार आणि पालिका/पंचायत बाजार चालू ठेवता येईल.
६. दुकाने आणि आस्थापने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू असतील.
७. उद्योग क्षेत्र, अत्यावश्यक सेवा बजावणारी सरकारी कार्यालये, कृषीविषयक कृती, स्थानिक संस्था, वैद्यकीय आणि सार्वजनिक सेवा, बांधकामविषयक कृती, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि औषधालये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया, टेलिकॉम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हीस, अधिकोष (बँक), विमा सेवा पुरवणारी आस्थापने, ए.टी.एम्., पेट्रोल पंप, घरगुती वापराचा गॅस पुरवठा करणारी कार्यालये चालू असतील.
निर्बंधाच्या काळातील मार्गदर्शक तत्त्वे
सर्व अशासकीय आस्थापनांनी कर्मचार्यांना घरून काम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कर्मचार्यांच्या ये-जा करण्याच्या वेळांमध्ये पालट करावा. कोरोनाची लक्षणे असलेल्या कर्मचार्यांनी घरीच राहून आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावे. कामाच्या ठिकाणी कुठेही गर्दी करू नये.
गोव्यात २४ घंट्यांत ५२ रुग्णांचा मृत्यू
पणजी, २ मे (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक अधिकच गडद होत चालला आहे. राज्यात मागील २४ घंट्यांत कोरोनाबाधित ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामधील १० रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यावर २४ घंट्यांत निधन झाले, तर ३ रुग्णांना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. मृत पावलेल्या ५२ पैकी ५ रुग्णांचे वय ४५ किंवा त्याहून अल्प आहे. दिवसभरात २ सहस्र ३० नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १ सहस्र २५५ रुग्ण बरे झाले. दिवसभरात ४ सहस्र ७९४ कोरोनाविषयक चाचण्या करण्यात आल्या.