साधकांच्या जीवितरक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘ईश्वर त्याच्या भक्तांचे कठीण काळात रक्षण करतोच’, हे जाणून आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची साधना वाढवण्यावर भर दिला. त्यासह साधकांना आपत्काळात आध्यात्मिक पाठबळ मिळावे; म्हणून ते संतांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्ठाने, यज्ञ-याग आदी करत आहेत. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी स्थुलातील सिद्धता करण्यासह अखिल मानवजातीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या अभूतपूर्व आध्यात्मिक कार्याचा संक्षिप्त मागोवा या विशेषांकाच्या रूपाने त्यांच्या चरणी अर्पण करतो !
वास्तविक शिष्याने गुरूंची सेवा करायची असते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले त्याला अपवाद आहेत ! त्यांनी साधकांसाठी किती केले आहे, याला सीमाच नाही ! हे गुरुदेवा, या अत्यंत कठीण काळात केवळ आपल्याच कृपेने आम्हा साधकांचे जीवन केवळ सुसह्य नव्हे; तर आनंदमय होत आहे, यासाठी कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!
लिखाणाच्या माध्यमातून प्रबोधन !
ग्रंथ, नियतकालिके आदींद्वारे आपत्काळाच्या भीषणतेविषयी समाजात जागृती आणि साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन !
व्याधींसाठी विशिष्ट नामजप शोधणे !
आपत्काळातील संजीवनी असलेले व्याधींच्या निवारणासाठी शोधलेले विशिष्ट जप, तसेच प्राणशक्तीवहन पद्धतीचा शोध !
धार्मिक विधींद्वारे देवतांना आवाहन !
मानवजातीच्या कल्याणासह साधकांच्या रक्षणाचा संकल्प करून शेकडो यज्ञ, तसेच विधी, हे मोठे आध्यात्मिक पाठबळ !
अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांगाने कृतीशील प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय !
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कोणताही सोहळा आयोजित करण्यात आलेला नाही. साधकांनी स्वतःच्या निवासस्थानी राहूनच जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत ! |