ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षेची सोय

सोलापूर – पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षा ६ मेपासून प्रारंभ होत आहेत. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांकडे भ्रमणभाष नाही, त्यांना महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक विकास कदम यांनी दिली.

कदम पुढे म्हणाले की,

१. कला, वाणिज्य, विज्ञान यांच्या पदव्युत्तर परीक्षा आणि अभियांत्रिकी परीक्षा ९ मेपासून प्रारंभ होत आहेत.
२. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही अशांनी आवेदन करावे. नंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.
३. परीक्षा काळात इंटरनेट खंडित होऊ नये आणि वीज जाऊ नये म्हणून संबंधित विभागांना पत्र पाठवले आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा.