कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी विवाह रोखणार्या जिल्हाधिकार्यांची क्षमायाचना

शैलेशकुमार यादव

आगरतळा (त्रिपुरा) – राज्यातील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेशकुमार यादव यांनी विवाहस्थळी जाऊन विवाह थांबवला. त्यामुळे झालेल्या टीकेनंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. यादव यांनी म्हटले आहे, ‘माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता.’ मुख्यमंत्री बिप्लवकुमार देब यांनी या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी यादव यांनी विवाहस्थळी स्वतःच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे या संदर्भातील प्रसारित झालेल्या व्हिडिओतून दिसून आल्याने लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (प्रशासनाने नागरिकांकडून कोरोनाचे पालन करवून घेतांना कायद्याचे उल्लंघन होत नाही ना ? याचीही दक्षता घेतली पाहिजे ! – संपादक)