कोरोना सेंटर रुग्णांसाठी लाभदायी ठरेल ! – विनय कोरे, आमदार

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना केअर सेंटर चालू

नवे पारगाव येथील महात्मा गांधी रुग्णालयात चालू झालेल्या ‘कोरोना केअर सेंटर’ च्या उद्घाटनप्रसंगी आमदार विनय कोरे, डाॅ. शिल्पा कोठावळे (उजवीकडे)

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) – कोरोना महामारीच्या काळात वारणा उद्योग, शिक्षण समूह आणि महात्मा गांधी रुग्णालयाच्या माध्यमातून चालू केलेले कोरोना रुग्णालय रुग्णांसाठी लाभदायक ठरेल. या रुग्णालयाच्या माध्यमातून १०० खाटा उपलब्ध होणार आहेत. येथे रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होतील, असा विश्‍वास वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला. येथील महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना केअर सेंटर चालू करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, डॉ. जयवंत पाटील, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष कुलकर्णी, डॉ. विराज कोरे, प्रदीप तोडकर, जीवनकुमार शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.