सिंधुदुर्गात नवीन १७४ रुग्ण सापडले : दोघांचा मृत्यू 

१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १९८

२. उपचार चालू असलेले रुग्ण १ सहस्र  २९०

३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ८६४

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ८ सहस्र ३५८

५. चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ५१

सावंतवाडीत एकाच कुटुंबातील ७ जणांना कोरोनाचा संसर्ग

सावंतवाडी – शहरात अनेक कुटुंबे कोरोनाबाधित आढळत आहेत. यापूर्वी ४ कुटुंबे कोरोनाबाधित आढळली होती. ११ एप्रिलला सबनीसवाड्यातील एकाच कुटुंबातील ७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा रुग्णालयात दुसरा ऑक्सिजन प्लान्ट चालू होणार

सिंधुदुर्ग – शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात १२ एप्रिल या दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. कोरोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची (ऑक्सिजनची) कमतरता भासू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनाने संमत केलेला दुसरा ऑक्सिजन प्लान्ट चालू करण्याविषयी आमदार नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी ‘लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लान्ट चालू केला जाईल’, असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.