अमेरिका येथे रहाणार्‍या रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू !

बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – नोकरीच्या निमित्ताने अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या येथील दांम्पत्याचा बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांचा ८ एप्रिलच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या रहात्या घरी आढळून आले. त्यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दांम्पत्याची ४ वर्षांची मुलगी मात्र सुखरूप आहे.

येथील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. नोकरीच्या निमित्ताने बालाजी हे मागील ६ वर्षांपूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते. शवविच्छेदनानंतर या दांम्पत्याने आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली हे स्पष्ट होऊ शकेल.