वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

महापालिकेच्या वॉररूमला भेट देऊन माहिती घेतांना पथकातील अधिकारी

सांगली, १० एप्रिल – केंद्रशासनाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता स्थानिक यंत्रणेकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत आले आहे. या पथकाने ९ एप्रिल या दिवशी महापालिकेच्या वॉररूमला भेट दिली. या वेळी महापालिकेच्या वॉररूमधून कोरोनाबाधित रुग्ण आणि विविध उपाययोजना यांसाठी केल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती घेतली आणि त्याविषयी समाधान व्यक्त केले.

सांगली महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी पथकातील सदस्यांना माहिती दिली. यानंतर महापालिका क्षेत्रातील विविध कोरोनाच्या संबंधित उपचार करणार्‍या रुग्णालयांना, तसेच महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही पथकाने भेट दिली.