केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना देहली उच्च न्यायालयाची नोटीस

  • विनामास्क निवडणुकीचा प्रसार

  • जनता आणि नेते यांना नियम वेगळा का ? – याचिकेद्वारे प्रश्‍न

नवी देहली – कोरोना संक्रमणामुळे देशातील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सर्वांना कोरोना महामारीचे नियम पाळणे आवश्यक असतांना नेते विनामास्क निवडणुकीच्या सभा घेत प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई का नाही ? तसेच सर्वसामान्य माणसांनीच नियम पाळावेत का ? असे प्रश्‍न असणार्‍या याचिकेवर देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. (असे जनतेला याचिका करून का विचारावे लागते ? सरकार आणि निवडणूक आयोग यांना कळत नाही का ? – संपादक)