सरकारच्या हप्तेखोरीची शिक्षा जनतेला भोगावी लागत आहे !

भाजपचे आमदार राम सातपुते यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

राम सातपुते

सोलापूर – ‘कोणी बेड देता का बेड ?, महाराष्ट्र सरकारचा ढिसाळ कारभार आणि हप्तेखोरी यांची शिक्षा महाराष्ट्राच्या जनतेला भोगावी लागत आहे. शांतीच्या काळात हप्तेखोरीत व्यस्त सरकार’, असे ट्वीट करत माळशिरस तालुक्याचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर दळणवळण बंदीही करण्यात आली आहे, तर काही जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या अल्प पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार राम सातपुते यांनी ही टीका केली आहेे.