‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’ हे आजपर्यंतचे सर्वाधिक राज्यघटनाविरोधी कलम आहे. मंदिरांची तोडफोड करून इतर धार्मिक स्थळे बांधली, याच्या विरोधात हिंदूंना आवाज उठवण्यास या कलमाने बंदी घालण्यात आली. दुसरीकडे वर्ष १९९५ मध्ये वक्फ बोर्डाला याविषयी काही हरकत असेल, तर त्यांना अन्य धर्मियांविरुद्ध न्यायालयात जाण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे आज काशी, मथुरा या देवस्थानांच्या जागेवर असणार्या मशिदी हटवण्यात अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मंदिरांसाठी हिंदू संघटित झाले, तर सरकारला निश्चितच याची नोंद घ्यावी लागेल.