हरिद्वार कुंभमेळा !
हरिद्वार (उत्तरखंड) – उत्तराखंड सरकारच्या कुंभमेळा प्रशासनाने ११ मार्चच्या महाशिवरात्रीच्या राजयोगी स्नानाला ‘राजयोगी स्नान’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले नसल्याने आखाड्याचे साधू, संत संतप्त असले, तरी या दिवशी १० लाखांहून अधिक भाविक स्नानाला येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यांच्या निवासासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र त्याहून अधिक लोक आल्यास त्यांना येथे रहाण्याची अनुमती नाकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.