१. दळणवळणबंदी चालू होण्याच्या ४ मासांपूर्वीच मुलीचे अमेरिकेचे पारपत्र रहित होणे आणि आस्थापनाकडूनही तिला पारपत्र मिळण्यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न होणे
माझ्या मोठ्या मुलीचा अमेरिकेहून दूरभाष आला की, तिचे पारपात्र रहित झाले आहे. नंतर ती डिसेंबर २०२० मध्ये भारतात परत आली. नेहमी ती डिसेंबर मासात घरी येते; परंतु या वेळी नोकरी नसल्याने ती येतांना घर रिकामे करून आणि घरातील सर्व सामान घेऊन भारतात परत आली होती. तिला कॅनडामध्ये नवीन नोकरी मिळाली होती; परंतु तिची कॅनडात नोकरी न करता अमेरिकेतील त्या आस्थापनामध्ये पुन्हा जाण्याची इच्छा होती. अमेरिकेतील ते आस्थापनही तिला परत अमेरिकेत बोलावत होते आणि तिच्या पारपत्रासाठी पुनःपुन्हा प्रयत्न करत होते.
२. आस्थापनाने केलेल्या प्रयत्नांनंतर मुलीला पारपत्र मिळणे; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे दळणवळणबंदी लागू झाल्याने मुलीचे अमेरिकेला जाणे रहित होणे, त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटापासून तिला दूर रहाता येणे
तिच्या आस्थापनाच्या पुष्कळ प्रयत्नांनंतर मार्चमध्ये तिला अमेरिकेला जाण्यास पारपत्र मिळाले; पण त्या वेळी दळणवळणबंदी लागू झाली. त्यामुळे तिचे अमेरिकेला जाणे रहित झाले. आता कोरोना (कोविड १९) महामारीने प्रभावित असलेल्या लोकांचे सर्वांत अधिक प्रमाण अमेरिकेमध्ये आहे. तेथील ज्या शहरामध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, त्याच शहरामध्ये माझी मुलगी एकटी रहात होती. आता जेव्हा आम्ही तेथील वार्ता ऐकतो, तेव्हा गुरुदेवांनीच तिची काळजी घेतली आहे, असे वाटून परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या प्रती कृतज्ञता दाटून येते.
३. अशा कठीण प्रसंगात गुरुदेवांनी मुलीला फुलाप्रमाणे सुरक्षित घरी पोचवले, असे वाटणे
ज्यांची मुले अमेरिकेत रहात आहेत, त्या मुलांच्या कुटुंबियांना मुलांच्या सुरक्षिततेसंबधी सदैव ताण येऊन काळजी वाटत आहे. जर आमची मुलगी अमेरिकेमध्ये असती, तर आम्हालासुद्धा तिच्या सुरक्षिततेविषयी ताण आला असता; परंतु गुरुदेवांनी जणू काही तिला फुलाप्रमाणे सुरक्षित आणि निर्विघ्नपणे घरी पोचवले, असे वाटते आणि गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त होते.
४. कृतज्ञता
हे गुरुदेवा, आपल्या या उपकारासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. सदगुरु (डॉ.) पिंगळेकाका नेहमी आम्हाला आश्वस्त करतात की, गुरुदेव प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले रक्षण करतात. ही अनुभूती म्हणजे त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण आहे. यासाठी परात्पर गुरुदेव, सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका आणि सनातनचे सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. संदीप कौर, फरिदाबाद (८.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |