धर्मांधांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम !

‘अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी येथील बाबरी मंडी भागातील हिंदूंनी आता त्यांची घरे विकून दुसरीकडे जाण्याची सिद्धता केली आहे. अनेक हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘हे घर विकणे आहे’ असे फलक लावले आहेत.’