नवी मुंबईत गर्भवतीचा मृत्यू !

मृत संगीता खरात (उजवीकडे)

नवी मुंबई – तुर्भे येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या संगीता खरात यांचा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या महिलेला प्रसुती होऊन मुलगी झाली. प्रसुतीच्या वेळी आधुनिक वैद्यांनी चुकीचे  वैद्यकीय उपचार केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.

संगीता खरात यांची तब्येत बिघडल्याने त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयातून खासगी फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या रुग्णालयाचे अडीच लाख देयक झाले. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाइकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि आधुनिक वैद्य यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक नगरसेवक राजेंद्र इंगळे यांनी प्रशासनाला याविषयी खडसावले आहे.