बागा (गोवा) समुद्रकिनार्‍याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण; तक्रारींकडे पोलिसांचा कानाडोळा !

कर्तव्यचुकार पोलीस !

असे पोलीस असून नसल्यासारखेच ! ‘रेस्टॉरंट’वाले आणि पोलीस यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याखेरीज पोलीस या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार नाहीत !

‘मागील काही मास दळणवळण बंदीमुळे बागा (गोवा) समुद्रकिनार्‍याजवळच्या परिसरात शांतता होती आणि या परिसरातील लोकांना रात्रीच्या वेळी शांतपणे झोप घेता येत होती; मात्र आता दळणवळण बंदी उठवल्याने काही ‘रेस्टॉरंट’ रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. बागा परिसरात असलेल्या ‘झेवियर रिट्रीट हाऊस’चे फादर सेड्रीक फर्नांडिस यांनी याविषयी सातत्याने कळंगुट पोलिसांत तक्रारी करूनही ध्वनीप्रदूषणाकडे पोलीस कानाडोळा करत आहेत.’