हुलजंती (जिल्हा सोलापूर) येथे महालिंगराया यात्रेच्या पालखी सोहळ्यात पोलिसांचा लाठीमार

यात्रा कमिटीच्या पदाधिकार्‍यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी पालख्यांसमवेतचे भाविक, तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकार्‍यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाचे राजकुमार ढोबळे यांनी तक्रार दिली.

दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी या परिसरात शिलवंती (उमरगा), बिरोबा (शिरढोण), विठोबा (सोन्याळ, जत), जकाराया (येणकी), बिराप्पा (जिरअंकलगी), बिरोबा (हुन्नूर), मड्डी जकराया, महालिंगराया (हुलजंती) या गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात प्रतिवर्षी आयोजित केला जातो. या सोहळ्यात सुरक्षित अंतराचे पालन करण्यात न आल्याने ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.