मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

भोपाळ (मध्यप्रदेश) – आम्ही विधानसभेत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार आहोत. हा एक अजामीनपात्र गुन्हा असेल आणि दोषींना ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशी माहिती मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. यापूर्वी उत्तरप्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले आहे.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आगामी विधानसभा सत्रात सरकारकडून ‘लव्ह जिहाद’च्या पार्श्‍वभूमीवर धर्मस्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाईल आणि कायदा सिद्ध झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला प्रविष्ट करून दोषींना ५ वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल. तसेच ‘लव्ह जिहाद’साठी साहाय्य करणार्‍यांनाही  मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा दिली जाईल आणि विवाहासाठी धर्मांतर करायला लावणार्‍यांनाही शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात असेल. जर स्वतःच्या इच्छेने धर्मपरिवर्तन करून विवाह करायचा असेल, तर संबंधित व्यक्तीला एक मास अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच बळजोरी करून आणि धमकावून केलेला विवाह, ओळख लपवून केलेला विवाह या कायद्यानुसार रहित मानला जाईल.