कणकवलीत तापामुळे तरुणाचा मृत्यू

कणकवली – शहरातील पिळणकरवाडी येथील ऋषभ (ऋत्विक) विजय पिळणकर (वय २२ वर्षे) याचे १५ नोव्हेंबरला तापसरीने निधन झाले. ताप येत असल्याने त्याला शनिवार, १४ नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाला. त्याच्या कोरोनाशी संबंधित प्राथमिक तपासणीचा अहवाल नकारात्मक आला होता. त्यामुळे त्या युवकाचा मृत्यू कशाने झाला ? हे स्पष्ट होऊ शकले नाही.