हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंगरौली (मध्यप्रदेश) येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रवचनाचे आयोजन

सिंगरौली (मध्यप्रदेश) – कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. शिवनाथ मिश्र यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.