इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना हात जोडून अभिवादन करण्याचे आवाहन

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते. यामुळेच हिंदु धर्मात ‘नमस्कार’ करण्यास सांगितला आहे ! कोरोनाच्या प्रभावामुळे का होईना, जगालाही नमस्काराचे महत्त्व पटू लागले. पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणार्‍यांनी आतातरी यातून बोध घेऊन धर्माचरणास प्रारंभ करावा !

कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःचे दोन्ही हात जोडले आणि सर्वांना ‘नमस्ते’ म्हटले. तसेच भारतीय नागरिक इतरांना कसे भेटतात आणि स्वागत करतात, हे नागरिकांना समजावले.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.