मलेशिया येथे पार पडलेल्या ‘द काला २०२० एशियन टेक्स्ट, ग्लोबल कान्टेक्स्ट’ या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘सर्वांत लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने’ या विषयावर शोधनिबंध सादर !
‘५ ते ८ फेब्रुवारी २०२० या दिवशी क्वालालंपूर येथे ‘द काला २०२० एशियन टेक्स्ट, ग्लोबल कान्टेक्स्ट’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ७ फेब्रुवारी २०२० या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘सर्वांत लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने’ या विषयावर पू. रेन्डी इकारांतियो यांनी एक शोधनिबंध सादर केला. हा शोधनिबंध ‘द पायोनिअर’ या भारतातील इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केला आणि त्याला त्या दिवशीचे ‘मोस्ट रीड’ म्हणजे सर्वाधिक वाचलेले वृत्त म्हणून स्थान मिळाले.’ हे वृत्त पुढील मार्गिकेवर वाचता येऊ शकेल. https://www.dailypioneer.com/2020/india/sanskrit-is-spiritually-pure-of-all-languages–claim-linguist