महाप्रसादाच्या वेळी संतांविषयी प्रसंग सांगतांना मिठात ‘ॐ’चे दर्शन होणे

ताटलीत घेतलेल्या मिठात उमटलेला ‘ॐ’

‘१०.११.२०१८ या दिवशी मी आणि माझी मोठी मुलगी कु. गौरी दुपारी महाप्रसाद ग्रहण करत होतो. त्या वेळी कु. गौरीने मला सांगितले, ‘एका संतांनी ‘तू (कु. गौरी) आगाशीत पणत्या छान लावल्या आहेस, तसेच तू घातलेले दागिने आणि साडीही छान आहे’, असे माझे कौतुक केले.’ मी महाप्रसाद घेत घेत कृतज्ञताभावात ते ऐकत होतेे. तेव्हा ताटलीतील (वेगळ्या ताटलीत मीठ घेतले होते) मीठ घेतांना तिचे लक्ष मिठाकडे गेले आणि ती म्हणाली, ‘‘अगं, बघ ! मिठात ‘ॐ’ उमटला आहे.’’ ॐ उमटलेला बघून माझी भावजागृती झाली आणि ‘केवळ संतांविषयी प्रसंग सांगताच त्यांच्याकडून चैतन्य  मिळते’, असे लक्षात आले.’

– सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०१८)