भगवंत भेटला गं, मज भगवंत भेटला ।

भगवंत भेटला गं ।
मज भगवंत भेटला ।
रूप त्याचे मनोहर पाहूनी ।
मी विसरले स्वतःला ॥ १ ॥

देव स्थुलातून कधी भेटेल ।
असे वाटत होते मजला ।
पण माझा भगवंत ।
साधकांचे गुण आणि प्रीती यांतून सतत भेटे मजला ॥ २ ॥

हे माधवा, तू असतोस अखंड ।
माझ्या संगे साधकांच्या रूपाने ।
हे मुकुंदा, तू आनंद देई मज ।
भावपूर्ण गुरुस्मरणाने ॥ ३ ॥

हे गोपाला, तुझा स्पर्श होतो अखंड ।
मला सेवेत असतांना ।
हे श्रीहरि, तू सतत आहेस माझ्या हृदयात ।
तुझ्या नामरूपाने ॥ ४ ॥

– कु. शिवलीला गुब्याड, सोलापूर (२०.१.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक