तव्यावरील पोळीवर ‘ॐ’ उमटणे

पोळीच्या एकाच बाजूवर तीन ठिकाणी उमटलेला ॐ (गोलात दाखवला आहे)

‘२५.२.२०१८ या दिवशी रविवार असल्याने मी घरी होतो. त्या दिवशी मी मुलांसाठी ‘व्हेज फ्रँकी’ (पोळीत भाजी घालून तिची गुंडाळी करून केलेला एक पदार्थ) बनवण्याचे ठरवले. मी हा पदार्थ करण्यासाठी आवश्यक ती सर्व सिद्धता केली. मी पोळीत भाजी भरली आणि तिची गुंडाळी करून भाजण्यासाठी पोळी गरम तव्यावर ठेवली. पोळी तव्यावर असतांना मला ‘पोळीवर ॐ उमटला आहे’, असे दिसले. मला ॐ च्या आकृतीतील चंद्र आणि बिंदू स्पष्टपणे दिसत होते. हे पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. विशेष म्हणजे पोळीच्या एकाच बाजूवर तीन ठिकाणी ॐ उमटले होते.’

– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, बेळगाव. (मार्च २०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक