१४ एप्रिलपर्यंत मुंबईतील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस बंद रहाणार ! – रेल्वे प्रशासन

मुंबई, २६ मार्च – मुंबई शहर आणि उपनगर यांमधील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावर एकही रेल्वे धावणार नसून या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे. यापूर्वी ३१ मार्चपर्यंत असलेला हा कालावधी पंतप्रधानांनी ‘लॉकडाऊन’ (दळणवळण बंदी) घोषित केल्यानंतर १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.