‘प्रगत’ भारतातील विदारक स्थिती !

‘जगात प्रत्येक ४० व्या सेकंदाला १ व्यक्ती स्वत:चे आयुष्य संपवते, तर प्रत्येक ३ सेकंदाला १ जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. भारतात वर्षभरात सुमारे १ लक्ष लोक आत्महत्या करतात. त्यात १५ ते ३५ या वयोगटांतील तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘मानसिक ताण’ हाच मनुष्य जीवनातील सर्वांत मोठा शत्रू ! : आत्महत्या करणार्‍यांची कारणे पाहिल्यावर त्यामध्ये ‘मानसिक ताण’ हा क्रमांक एकचा शत्रू झाला आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या पाहणीनुसार ४९ टक्के लोक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक दडपणाखाली वावरतात. त्यामुळे त्यांना नैराश्य येते आणि ते जीवनाचा अंत करतात. ७१ टक्के लोकांनी मानसिक तणावामुळे आत्मविश्‍वास गमावलेला असतो. हे सर्व जण सतत अप्रसन्नतेचा (नाराजीचा) सूर काढत असतात. ‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल्स सायंटिफीक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’च्या म्हणण्यानुसार जगातील ५० टक्के मुले मानसिक तणावाखाली जगत असतात.’

– श्री. सुजित तांबडे (संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स)

(‘मनुष्यजन्माचे ध्येयच ईश्‍वरप्राप्ती करणे, हे आहे’, हे जाणल्यास मनुष्याचे त्या दिशेने प्रयत्न (साधना) होतील. साधना करणार्‍याला शाश्‍वत आनंदच मिळत असल्याने ताण येत नाही, तसेच आत्महत्या करण्याचा दूरदूर विचारही येत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे हे शाश्‍वत उपाय न सांगता केवळ वरवरचे आणि मानसिक स्तरावरचे उपाय सांगितले जात असल्याने आत्महत्येची समस्या कधीच सुटली नाही. ‘हिंदु राष्ट्रा’त जनता साधना करणारी असल्याने सर्वत्र सुख, समृद्धी आणि शांती असेल ! – संपादक)