
नवी देहली – मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे, असे विधान अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत केले.
जॉन अब्राहम पुढे म्हणाले, ‘‘मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी अभिनेता असल्याने कदाचित् लोक माझ्याविषयी वाद निर्माण करत असावेत. मी अल्पसंख्यांक आहे. माझी आई झोराष्ट्रीयन, तर वडील सीरियन ख्रिश्चन आहेत. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मला माझा देश फार आवडतो. मला माझ्या देशात नेहमीच सुरक्षित वाटते.’’
संपादकीय भूमिका‘भारतातील अल्पसंख्य असुरक्षित आणि घाबरलेले आहेत’, अशी नेहमी ओरड करणारे मुसलमान, काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी, तसेच अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’, ‘संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग’ यांसारख्या संस्थांना याविषयी काय म्हणायचे आहे ? |