दिंडोरी (नाशिक) येथे लाखो रुपयांचा अवैध ‘सॅनिटायझर’चा साठा जप्त

दिंडोरी (जिल्हा नाशिक) – तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या स्वार्थांधांवर सरकारने त्वरित कठोर कारवाई करणे आवश्यक !  संपादक) या प्रकरणी दिंडोरीचे पुरवठा अधिकारी रवींद्र निरभुवणे यांनी तक्रार दिली होती.