भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

डॉक्टर, वैद्य, रुग्णालये आदींची होणारी अनुपलब्धता लक्षात घेऊन आरोग्य चांगले रहाण्यासाठी हे करावे !

कौटुंबिक वापरासाठी ‘प्रथमोपचार पेटी’ सिद्ध ठेवावी ! : वेदनाशामक गोळ्या, मलम, गॉज (जखमेवर लावायची जाळीदार पट्टी), जखमेवर लावायची पांढरी चिकटपट्टी इत्यादी; तसेच ताप, उलट्या इत्यादी आजारांवरील औषधे प्रथमोपचार पेटीत ठेवावीत. ती पेटी घरात सहज सापडेल, अशा ठिकाणी ठेवावी. प्रथमोपचार पेटीत शक्यतो गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) ठेवू नये; कारण तिच्यातून गोळ्या काढतांना औषध संपल्याच्या तारखेचा (‘एक्स्पायरी डेट’चा) भाग फाटू शकतो. असे झाल्यास काही महिन्यांनी आपल्याला

‘त्या गोळीची वैधता कधीपर्यंत आहे’, हे कळू शकत नाही. त्यामुळे पाकिटातून गोळ्या काढून त्या एका हवाबंद डबीत ठेवाव्यात आणि त्या डबीवर गोळीचे नाव, कोणत्या विकारावर उपयोगी, उत्पादनाचा दिनांक (मॅन्युफॅक्चरिंग डेट), कालावधी संपण्याचा दिनांक (एक्स्पायरी डेट), अशा आवश्यक गोष्टींची चिठ्ठी (लेबल) चिकटवावी. (प्रथमोपचार पेटीविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार’ यात केले आहे.)

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)