शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांना ‘ब्लँकेट’ वाटप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांना ‘ब्लँकेट’ वाटप करतांना दिगंबर जाधव (मरून रंगाचा सदरा), उजवीकडे प्रसाद रिसवडे, तसेच अन्य

सांगली, २९ जुलै (वार्ता.) – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना सांगली विधानसभा आणि ‘वसुधा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागातील गरजू १०० नागरिकांना उबदार ‘ब्लँकेट’चे वाटप करण्यात आले.

या वेळी शिवसेना जिल्हासंघटक दिगंबर जाधव, शिवसेना वैद्यकीय विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. श्रीकांत ठाणेकर, सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी, माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, ‘वसुधा फाऊंडेशन’चे अध्यक्ष संतोष पाटील यांसह अन्य उपस्थित होते.