गलवान खोर्यातील संघर्षानंतर चीनच्या सैन्याला अजून चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे ! – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणार्या गलवान खोर्यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला अजून सिद्धतेची अन् चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे जाणवले आहे, असे विधान भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.