नाशिक – तुम्ही जर शौर्यशाली आणि पराक्रमी असाल, तर तुमचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले जाईल. चित्रपट, टिव्ही यांद्वारे केवळ हिंदु देवतांचेच विडंबन केले जात आहे. आपल्या हिंदु कार्यकर्त्यांना मारले जात आहे किंवा त्यांना खोट्या आरोपाखाली कारागृहामध्ये टाकले जात आहे. स्वरक्षणासाठी आपल्याला शौर्यजागृतीविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमदाडे यांनी उपस्थितांना केले. समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये ते बोलत होते. तसेच आजच्या काळात शौर्य प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता सांगून प्रथमोपचार वर्गाविषयीही त्यांनी सांगितले. या वेळी कु. किंजल सोनवणे यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला, तर सूत्रसंचालन कु. संस्कृती वाघ यांनी केले. या कार्यक्रमात शौर्यविषयक प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ दाखवून सर्वांची शौर्यजागृती करण्यात आली.
विशेष
मनोगत व्यक्त करतांना अनेकांनी ‘धर्माची जागृती करता हे पुष्कळ आवश्यक आहे. आज शिकलेल्या व्यक्तीलाही धर्माविषयी विचारले, तर सांगता येत नाही; म्हणून समिती करत असलेले प्रयत्न पुष्कळ सुंदर आहेत’, अशा प्रकारे कौतुक केले.