अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

स्वसंरक्षण प्रशिक्षण

सोलापूर – सध्या देशभरातील हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. भारतियांनी पाश्‍चात्त्यांची विकृती अवलंबल्याने हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदूंना इतिहासकालीन शौर्याचा विसर पडल्याने हिंदु युवकांची भरदिवसा हत्या करण्यात येत आहे. पोलिसांवरील आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हिंदूंनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.

अभिप्राय

कु. ऋतुजा ढगे (धाराशिव) आणि कु. निलीमा सरवदे (बीड) – व्याख्यान ऐकून पुष्कळ छान वाटले, मनामध्ये उत्साह निर्माण झाला.