२८ एप्रिल (वार्ता.) – वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंच्या हातातील शस्त्रे इंग्रजांनी काढून घेतली आणि वर्ष १९२० नंतर हिंदूंच्या मनातील शस्त्रे अहिंसेच्या नावाखाली काढून घेतली. त्यामुळे हिंदू शौर्य विसरत गेले, अन्यायाविरुद्ध लढण्याचे विसरत गेले. कुणीतरी येईल आणि माझे रक्षण करेल या मानसिकतेतून बाहेर पडून मला स्वतःला माझे रक्षण करायला सिद्ध व्हायचे आहे. आता रडायचे नाही, तर संघर्ष करायचा आहे, असा निर्धार केला तरच आपण येणार्या काळात जगू शकू, अशा प्रकारचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले. त्या शौर्य जागृती व्याख्यानाच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होत्या. या व्याख्यानाला ३२ युवक-युवतींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संकेत कुलकर्णी यांनी केले. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षण संदर्भातील प्रात्यक्षिकांचा एक व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला.
काही धर्मप्रेमींचे मनोगत
१. सौ. माधवी मांगलेकर – महिलांना काळानुसार प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्तरावर सिद्ध झालेच पाहिजे.
२. श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी, कागल – कार्यक्रम पहातांना आपले शरीर आणि प्रकृती कणखर केली पाहिजे, याची जाणीव झाली. स्वतः प्रशिक्षण घेऊन इतरांना द्यावे असे वाटले. प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढेल आणि संकटांना तोंड देता येईल असेही वाटले.
३. श्री. कौस्तुभ आपटे – प्रात्यक्षिके पुष्कळ महत्त्वाची आहेत. माझ्यावरही असाच प्रसंग आला होता, तेव्हा मी चांगल्या प्रकारे कसा प्रतिकार करू शकलो असतो ते आज लक्षात आले. मानसिक स्तरावर सर्वांची सिद्धता व्हायला पाहिजे.