Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्‍यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला

न झालेल्या भारत-अमेरिका कराराला करण्यात येणार होता विरोध !

नवी देहली – पंजाबच्या शेतकर्‍यांनी देहलीकडे काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला आहे. २१ जुलैला येथील शंभु सीमेवरून मोर्चासाठी आलेले शेतकरी परत फिरू लागले आहेत. अमेरिका-भारत व्यापार कराराच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा करार झालेला नाही.

शेतकरी नेते दिलबाग सिंह दिराजके यांनी सांगितले की, हरियाणाचे कृषीमंत्री श्याम सिंह राणा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मागण्यांवर एकमत झाले. त्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.

कोणताही करार झाला नाही; मग हे आंदोलन कशासाठी? – भाजप

पंजाब भाजपचे प्रवक्ते अनिल सारिन म्हणाले की, अद्याप कोणताही करार झालेला नाही. कोणताही तपशील घोषित झालेला नाही; मग हे आंदोलन कशासाठी ? सरकारने जे काम केलेलेच नाही, त्याविरोधात ते आंदोलन करत आहेत. शक्यता ही आहे की, या नेत्यांचे परदेशात ओळखीचे लोक असतील; म्हणूनच त्यांना सर्व काही ठाऊक आहे. काही लोकांना नेहमीच पंजाबचे वातावरण बिघडवायचे असते.