जगभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता
मॉस्को (रशिया) – गेल्या ६ मासांत रशियाने तब्बल ४४ टन (अनुमाने ४४ सहस्र किलो) सोन्याची विक्री केल्याची माहिती ‘रशियन मध्यवर्ती बँके’च्या अहवालात उघड झाली. यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोन्यामध्ये इतिहासातील ही सर्वांत मोठी उलथापालथ असेल. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये रशियाचा क्रमांक वरचा आहे.
जुलै २०२६ च्या आरंभी रशियाकडे २ सहस्र २८२ मेट्रिक टन सोन्याचा साठा शेष असून वर्षाच्या आरंभीच्या साठ्याच्या तुलनेत तो अनुमाने ४४ टन अल्प झाला आहे. युक्रेन युद्धानंतर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे महसुलावर ताण आल्याने रशियाने सोन्याची विक्री केल्याचे मानले जात आहे; मात्र हे सोने नेमके कुणाला विकले ?, याविषयी रशियन प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या रशियाकडे असलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २९९ अब्ज डॉलर्स (अनुमाने २५ लाख कोटी रुपये) इतके आहे.
भारतात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ
भारतात सलग दुसर्या दिवशी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४३ सहस्र रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा भाव २ लाख २१ सहस्र रुपये प्रतिकिलो इतका होता.

‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !