Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारने एक रुपयाच्या नव्या नाण्याला संमती दिली असून यातून पूर्वीचा नकाशा हटवण्यात आला आहे. या नकाशात लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हे भारताचे भाग नेपाळचे असल्याचे दाखवण्यात आले होते. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने मे २०२० मध्ये नवीन राजकीय नकाशा प्रसारित केला होता. या नकाशाऐवजी आता ‘लो ग्याकर मठा’चे चित्र नाण्यावर असणार आहे. हा नेपाळमधील सर्वांत जुन्या बौद्ध मठांपैकी एक मानला जातो. (नेपाळ बहुसंख्य हिंदु असणारा देश असतांना हिंदूंचे चिन्ह नाण्यावर का नाही ?  असा प्रश्न नेपाळी हिंदूंनी सरकारला विचारला पाहिजे ! – संपादक)

भारत आणि नेपाळ यांच्यात लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा यांवरून दीर्घकाळापासून सीमावाद आहे. नेपाळ या प्रदेशांवर त्याचा दावा करतो, तर भारत त्यांना स्वतःचा प्रदेश मानतो.