Modi On Paper Leak :  प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात जे लोक सहभागी होते, त्यांपैकी १३ लोकांना अटक करण्यात आली आहे. जे याला उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर सर्वांत कठोर कारवाई केली गेली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुणीही असे करण्याचे धाडस करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय दलाच्या बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान मोदी बैठीकत पुढे असेही म्हणाले की, उत्तरदायी लोकांना पकडल्यानंतर सरकारने पुन्हा परीक्षा घेतली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण भयंकर पाप आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी सर्व राज्यांनी एकत्रित मिळून काम करायला हवे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही विषय हलक्यात घेता येणार नाही. राज्य सरकारांनी परीक्षा पद्धत सुरक्षित करायला हवी. अशा घटना घडू नयेत; म्हणून परीक्षा पद्धत अधिक बळकट करावी लागेल.