Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !

पाक वंशाचा कुख्यात गुन्हेगार शब्बीर अहमद याला पाकने परत त्याच्या देशात घेण्यास नकार दिल्यानंतर ब्रिटनमधील विरोधी पक्षांची मागणी

शब्बीर अहमद

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनने पाकिस्तानला ३ वर्षांसाठी संमत झालेले १ सहस्र ९६३ कोटी ७० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य आणि पाकच्या नागरिकांना देण्यात येणारा व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) थांबवावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी तेथील सरकारकडे केली आहे. पाकिस्तानी वंशाचा मुला-मुलींचे लैंगिक शोषण करणारा कुख्यात गुन्हेगार शब्बीर अहमद याला पाकने परत त्याच्या देशात घेण्यास नकार दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये जन्मलेला शब्बीर अहमद रोचडेल ग्रूमिंग गँगचा (लहान मुली किंवा तरुणी यांना आमिषे दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या टोळीचा) प्रमुख सदस्य होता. त्याला लहान मुलींवर बलात्कार केल्याच्या ३० प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. २२ वर्षांच्या शिक्षेपैकी १४ वर्षे कारागृहात काढल्यानंतर या महिन्यात त्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनने वर्ष २०१६ मध्ये त्याचे नागरिकत्व रहित केले होते; परंतु वर्ष १९७१ च्या इमिग्रेशन (परदेशातून नवीन देशात होणारे कायमस्वरूपी स्थलांतर) कायद्यांतर्गत मिळालेल्या कायदेशीर संरक्षणांमुळे सरकार त्याला हद्दपार करू शकले नाही. गृह सचिव शबाना महमूद यांनी सांगितले आहे की, अशा अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये कायद्यात सुधारणा केली जाईल.

पाकने हात झटकले !

या प्रकरणात पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, अहमदने दशकांपूर्वी पाकिस्तानी नागरिकत्व सोडले होते आणि त्याचे दायित्व जिथे त्याचे संगोपन झाले आणि त्याने गुन्हे केले, त्या ब्रिटनचे आहे. (ब्रिटनने आता अशा गुन्हेगाराला फाशी द्यावी किंवा आजन्म कारागृहात डांबावे, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानी म्हणजे गुन्हेगार आणि आतंकवादी, अशी आता जगात ओळख झाली आहे. जगाने आता पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्यावर सर्व प्रकारचा बहिष्कार घातला पाहिजे ! यासाठी भारतानेही पुढाकार घेतला पाहिजे !
  • भारताची फाळणी करून पाकिस्तान निर्माण करण्यात ब्रिटिशांचा मोठा हात होता. आता पाकिस्तानी ब्रिटनला डोईजड होत असतील, तर ते त्याच्या कर्माचे फळच म्हणावे लागेल !