ढाका (बांगलादेश) – भारताच्या सीमेच्या अत्यंत जवळ असलेल्या बांगलादेशातील सिल्हाट येथे अमेरिकी सैन्याने बांगलादेशी सैन्यासमवेत संयुक्त युद्धसराव चालू केला आहे. दोन्ही देशांकडून सांगण्यात आले आहे की, बांगलादेश आणि अमेरिका यांनी धोरणात्मक भागीदारी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी हा संयुक्त सैनिकी सराव चालू केला आहे. बांगलादेश सशस्त्र दलाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार १३ दिवस चालणारा हा सराव १९ जुलैपासून चालू झाला असून तो ३१ जुलै या दिवशी समाप्त होईल. हा सराव बांगलादेश सैन्याच्या विशेष युनिट ‘पॅरा कमांडो ब्रिगेड’च्या देखरेखीखाली होत आहे.
सिल्हाट भारतासाठी अत्यंत संवेदनशील
सिल्हाट भाग भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या प्रामुख्याने मेघालय आणि आसाम यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेला अगदी लागून आहे. अशा स्थितीत भारताच्या सीमेजवळ अमेरिकी सैन्याची सक्रीयता आणि विशेष ‘जंगल ऑपरेशन्स ट्रेनिंग’ यांमुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ईशान्य भारताची सुरक्षा आणि भू-राजकीय स्थिरता यांच्या दृष्टीने सिल्हाट अत्यंत महत्त्वाचे आहे.

Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !