महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन ! – श्री.ओंकार  शुक्ल

मिरज, २८ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी मुक्त हस्त आणि ५ वी ते ७ मधील विद्यार्थ्यांसाठी माझा महाराष्ट्र या विषयावर चित्र काढायचे आहे. या स्पर्धेत केवळ सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतील, अशी माहिती भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली आहे.

श्री. ओंकार शुक्ल पुढे म्हणाले, यात इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थी खडूचे रंग वापरू शकतात, तर ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी ब्रशने रंगवायचे रंग वापरून चित्र काढावे. ही सर्व चित्रे ९८३८४ ६१६१७ या क्रमांकावर पाठवावीत. छायाचित्र पाठवण्याचा अंतिम दिनांक ३ मे आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सर्वांना सहभागाचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार असून आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.